PM Awas Yojana 2025 Maharashtra नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या हक्काचे घर बांधायचे आहे का ? तर त्यासाठीच तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. यातीलच सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पीएम आवास योजना आणि या योजनेद्वारे देशभरातील सर्व गरजू आणि गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर बांधण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून आता या 2025 च्या लाभासाठी तुमच्याकडे शेवटची संधी असणार आहे आता या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुमचे अर्ज करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असेल किंवा अर्ज प्रक्रियेबद्दल पात्रता ही माहिती खाली देण्यात आली आहे.
PM Awas Yojana Maharashtra 2025
पीएम आवास योजनेअंतर्गत देशभरातील सर्वच गरजूंना आम्ही घर देणार असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचे द्वारे मागील काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते. मागील वर्षी ज्यांना घरकुल मंजूर झालेत त्यांना देखील आता घरकुल योजनेअंतर्गत पहिले दोन हप्ते त्यांच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची काम देखील सुरू आहेत.
2025 साठी देखील आता याची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याला मागील दोन वेळेस मुदत वाढ देखील देण्यात आली आहे त्यामुळे आता अर्जदारांकडे शेवटची संधी असणार आहे.
| योजनेचे नाव | पीएम आवास योजना 2025 |
| विभाग | केंद्र सरकारी योजना |
| मिळणारा लाभ | 02 ते 2.5 लाख रुपये |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
| अर्ज करण्याची मुदत | 18 जून 2024 |
2025 च्या घरकुल ग्रामीण साठी अर्ज करण्यास 18 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि आता याची मुदत वाढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत.
PM Awas Yojana Online Apply 2025 Marathi
घरकुल 2025 साठी मोबाईल वरून देखील ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा सर्व्हे अर्थातच अर्ज भरू शकता यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून आवास प्लस आणि आधार फेस आरडी या दोन एप्लीकेशनला डाऊनलोड करावे लागणार आहे. एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला आवास प्लस हे ॲप्लिकेशन ओपन करून त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी द्वारे सर्व माहिती सविस्तरपणे भरून ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट करता येईल. PM Awas Yojana 2025 Maharashtra
हा अर्ज भरत असताना तुम्हाला यामध्ये काही कागदपत्रांची देखील आवश्यकता लागणार आहे जेणेकरून त्यांचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करताना द्यावा लागतो जसे की आधार कार्डचा नंबर असेल किंवा ज्याच्या नावाने तुम्ही घरकुल साठी अर्ज करणार आहात त्याचा जॉब कार्ड नंबर असेल अशी काही कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचे असणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जुन्या घराचा फोटो अपलोड करावा लागतो आणि त्यासोबतच ज्या नवीन ठिकाणी तुम्ही तुमचे घर बांधणार आहात तो देखील फोटो व्यवस्थित पद्धतीने काढून तुम्हाला अपलोड करावा लागत असतो जेणेकरून तुम्हाला खरंच घराची गरज आहे का याची पडताळणी केली जाते.
PM Awas Yojana Maharashtra 2025 Offline Form
काही वेळा आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात आणि त्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही आणि मग अशा वेळीच ज्यांना ऑनलाईन पद्धतीने शक्य नाही त्यांना ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत असते.
यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काही कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ती कागदपत्रे योग्य पद्धतीने जमा झाल्यानंतर त्याची पडताळणी करून ग्रामपंचायत द्वारे तुमचा अर्ज भरला जातो आणि हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.
PM Awas Yojana 2025 Maharashtra Documents
योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र द्यावी लागणार आहेत :
- आधार कार्ड
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- जॉब कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज चे फोटो
- रेशनिंग कार्ड
- स्वयंघोषणापत्र
- मोबाईल नंबर
