Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण पुन्हा सुरू होणार का ज्या महिलांना सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्या सर्व महिलांना योजनेचा लाभ पुन्हा दिला जाणार का ? असे काही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांना मिळाले नाहीत.
ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता जुलै महिन्याचे पैसे कधी येणार जुलै महिन्याअंतर्गत किती रुपये मिळणार असे देखील विविध प्रकारचे प्रश्न आहेत त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana Next Installment Date
मित्रांनो 2024 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आणि योजनेची त्वरित अंमलबजावणी देखील करण्यात आले.
योजनेअंतर्गत राज्यभरातील गरजू आणि पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले गेले.
योजना सुरू करत असतानाच राज्य सरकार द्वारे सुमारे अडीच कोटी महिलांचे यामध्ये टार्गेट ठेवण्यात आले होते परंतु अनेक महिलांनी योजनेअंतर्गत आपले अर्ज केले आणि परिणामी निवडणुका जवळ आले असल्याने आणि योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करायचे असल्याने सरकारकडून सर्व अटी व निकषांची पडताळणी केली गेली नाही आणि योजनेअंतर्गत अनेक अपात्र अथवा योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नसणाऱ्या महिला देखील योजनेच्या लाभार्थी झाल्या.Ladki Bahin Yojana Next hafta
Ladki Bahin Yojana June Hafta List
परंतु जानेवारीपासूनच योजनेअंतर्गत महिलांच्या विविध अटी व निकषांची पडताळणी सुरू केली ज्यामध्ये सरकारी नोकरदार महिलांना योजनेमधून बाद करण्यात आले, त्यासोबतच कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा निवृत्ती वेतनधारक असल्यास त्यांना देखील योजनेमधून अपात्र केले.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आले त्यासोबतच पीएम किसान अथवा नमो शेतकरी या शेतकरी योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पाचशे रुपये दिले जातात.
चार चाकी वाहन असेल किंवा उत्पन्नाची मर्यादा असेल अशा सर्व अटी व निकषांची सरकारकडून अंमलबजावणी कडक स्वरूपात सुरू असल्याने अनेक महिला योजनेमधून बाद झाल्या आणि पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.
Ladki Bahin Yojana July Hafta Date
लाडक्या बहिणींना 3000 रुपये यादिवशी जमा होणार –
आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कधी मिळणार तर लक्षात घ्या सर्वात आधी हे तीन हजार रुपये सरसकट सर्व महिलांना मिळणार नसून ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता आणि त्यांनी त्यांचा तक्रार अर्ज सबमिट केला तो तक्रार अर्ज दुरुस्त होऊन त्यांचा अर्ज Resolved झाला त्याच लाभार्थी लाडक्या बहिणींना जुलै महिन्या अंतर्गत जून आणि जुलै दोन्ही महिन्यांचे मिळून पैसे दिले जाणार आहेत.
आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख अजूनही जाहीर झाली नसली तरी देखील मागील तीन चार महिन्यांपासून आपण पाहत आहे महिन्याचा हफ्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होतो त्यामुळे यावेळी देखील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहिण जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे.Ladki Bahin Yojana Next hafta
