Ladki Bahin Yojana May Installment Date लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण ज्या हप्त्याची अथवा पैशाची वाट मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी पाहत होत्या तोच लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे.
याबद्दलची माहिती आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याद्वारे देण्यात आली असून त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हे पैसे कधी जमा होणार तसेच किती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणारी आणि महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली योजना म्हणून नावारूप आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या बँक खात्यावरती थेट जमा होत असल्याने विविध महिला यामुळे आपला संसार असेल किंवा इतर बाबींसाठी या निधीचा योग्य पद्धतीने वापर करत आहेत आणि त्यामुळे ही योजना सर्वसमावेशक असल्याचे देखील लाडक्या बहिणीच्या तोंडून येत आहे.
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश :
लाडकी बहीण योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास ही योजना 2024 च्या अधिवेशनावेळी राज्य सरकार द्वारे घोषित करण्यात आली होती आणि त्यावेळी देखील महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे असतील अथवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याद्वारे देखील स्पष्टपणे सांगण्यात आले होते की या योजनेचा उद्देश म्हणजेच की महिला सक्षमीकरण आणि महिलांचे जीवनमान उंचावणे हाच असणार आहे.
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
| योजना विभाग | महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र राज्य |
| मिळणारा लाभ | महिना 1500 रुपये |
| लाभार्थी संख्या | 2.5 कोटी महिला |
Ladki Bahin Yojana यादी Maharashtra
लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी व अर्ज प्रक्रिया :
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी अथवा संख्येबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेची घोषणा करतानाच आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे स्पष्ट करण्यात आले होते की योजनेमध्ये सुमारे २.५ कोटी महिलांचे लक्ष राज्य सरकारच्या द्वारे ठेवण्यात आलेले आहे. सुरुवातीला या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन असेल अथवा वेबसाईट असेल, महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल आणि अंगणवाडी सेविका यांच्या सर्वांच्या द्वारे योजनेसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर काही प्रमाणामध्ये लाडके बहिण योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ असेल किंवा इतर अनेक बाबी लक्षात आल्यानंतर योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आणि त्यानंतर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या सर्व अटी व निकषांमध्ये बसत आहेत अशा सर्व महिलांना अथवा लाडक्या बहिणींना तुमच्या गावातील अथवा जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्यांच्याद्वारे नोंदणीच प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली होती.
या योजनेसाठी सध्या कुठल्याही प्रकारे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू नाही. कारण योजनेमध्ये राज्य सरकार द्वारे जेवढे टारगेट ठेवण्यात आले होते त्याहून अधिक महिला सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. आणि पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास यामध्ये लाभार्थी संख्या वाढू शकते आणि परिणामी सरकारवर देखील याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा येणार आहे.
Ladki Bahin Yojana form
लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होऊ शकते का नाही ?
नवीन अर्ज प्रक्रिये बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये वरती सांगितल्याप्रमाणे सध्या तरी सरकार या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार करत नसल्याचे महिला व बालविकास विभागाद्वारे सांगण्यात आले आहे. याबाबत विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी देखील नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो आणि बैठकीमध्ये सध्या याबद्दल कुठल्याही प्रकारचा विषय निघाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया लगेच सुरू होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत.
लाडकी बहिण योजने अंतर्गत या महिलांना मिळणार 500 रुपये –
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही हफ्त्यांपासून काही पात्र व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती 1500 च्या ऐवजी 500 रुपये जमा होत आहेत. याबद्दल सरकारकडून देखील आता काही बाबी स्पष्ट करण्यात आले आहेत आणि त्यानुसार ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत म्हणजेच की शेतकरी असून पीएम किसान सन्मान योजना असेल अथवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल या योजनांचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिना 500 रुपयांप्रमाणेच मिळणार आहे.
याचे कारण सरकारी योजनांच्या लाभ घेणाऱ्या महिला असतील अथवा पुरुष असतील यांना जास्तीत जास्त वार्षिक 18000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात येईल असे सरकार द्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे, आणि त्यामुळेच यापुढे या सर्व शेतकरी बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana May Installment Date
लाडकी बहिण योजना मे हफ्ता यादिवशी –
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे द्वारे अपडेट देण्यात आले असून त्यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागणारा पावणे चारशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून म्हणजेच की अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्यासोबतच येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता सर्व पात्र आणि लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि त्यामुळे मे महिना संपण्याच्या आधीच यावेळी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे 1500 रुपये जमा होणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये ज्या पद्धतीने उशीर झाला होता तसा उशीर यावेळी होणार नसल्याचे आता महिला व बाल विकास विभाग असेल अथवा सरकार असेल या दोघांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार मे महिना हफ्ता 3000 रुपये –
मे महिन्यांतर्गत काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3000 रुपये जमा केले जाणार आहेत आता यामध्ये कोणत्या बहिणी असणार आहेत तर एप्रिल महिन्यामध्ये अशा अनेक लाडक्या बहिणी होत्या की ज्यांचे आधार डीबीटी काही त्रुटी होत्या आणि त्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्या अंतर्गत निधी वर्ग करण्यात आला नव्हता परंतु अशा महिलांनी आता मात्र आपली बँक खाते असतील किंवा ऑनलाईन डीबीटी मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दुरुस्त केल्या आहेत आणि त्यामुळे तथाश्या महिलांना एप्रिल आणि मे असे दोन्ही महिन्यांचे मिळून देखील 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत.

| लाडकी बहिण योजना वेबसाईट पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
| योजना अधिकच्या माहितीसाठी | 👉येथे क्लिक करा |
Ladki Bahin Yojana Rejected List 2025
या लाडक्या बहिणींना नाही मिळणार योजनेचे पुढील पैसे –
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना मागील काही महिन्यांपासून पैसे येण्याचे बंद झाले आहे आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू असून यावेळी देखील काही महिला अशा असणार आहेत की ज्यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
मित्रांनो लाडकी बहिण योजना सुरू करत असताना सरकारकडून काही नियमावली व अटी देखील देण्यात आल्या होत्या आणि ही योजना फक्त गरजू महिलांसाठी ज्यांना खरच गरज आहे अथवा ज्यांचे पोट हातावर अवलंबून आहे अशा भगिनींसाठीच ही योजना असल्याचे सरकार द्वारे स्पष्ट करण्यात आले होते.
परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक लाडकी बहिणींनी किंवा महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज केला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न चांगले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीला अथवा चांगल्या पगाराच्या नोकरीला कुटुंबातील सदस्य आहेत अशा देखील अनेक महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचे लक्षात आले होते परंतु आता हळूहळू अशा महिलांचे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विविध स्तरांवर सुरू असल्याचे देखील माहिती मिळत आहे.
लाडकी बहिण योजना पात्रता व अटी –
- योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 65 वयोगटातील असावे.
- लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे.
- महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा निवृत्ती वेतनधारक नसावी.
- लाभ घेणारी महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेणारी नसावी.
- लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेणारी महिला आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- लाभ घेणाऱ्या महिनेच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती खासदार, आमदार अथवा जिल्हा परिषद सदस्य नसावे.
- लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी.
- एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.