Ladki Bahin Yojana June Hafta List लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी निराशा व्यक्त केली होती कारण त्यांना जून महिन्यांतर्गत योजनेचे पैसे जमा झाले नाहीत.
आता ज्यांना जूनमध्ये पैसे आले नाहीत त्या सर्व महिला योजनेमध्ये बाद झाल्या का परत पैसे येणार का नाही असे देखील अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना होते परंतु यामध्येच आता योजनेअंतर्गत आनंदाची बातमी समोर येत आहे आणि यामध्ये आता महिलांना थेट 3000 रुपये जमा होणार आहेत आता हे पैसे कोणत्या महिलेला जमा होणार तुम्हाला मिळणार का हे कसे पाहायचे याबद्दलची माहिती घेऊया.
Ladki Bahin Yojana June Hafta List
मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल आपण पाहिले की ज्यावेळी जून महिन्याचा हप्ता जमा झाला तेव्हा अनेक महिलांना योजनेमध्ये सर्व अटींमध्ये पात्र असून निकषांमध्ये बसून देखील योजनेचे पैसे मिळाले नाहीत.
आणि त्यामुळेच अनेक महिलांनी याबद्दल आपली निराशा व्यक्त केली होती सोशल मीडिया असेल अथवा विविध माध्यमांमधून अनेक लाडक्या बहिणी सरकारकडे आपली नाराजी व्यक्त करत होत्या की आम्ही सर्व गरीब आहे किंवा आम्ही या योजनेचे खरे लाभार्थी आहोत आम्हाला योजनेची गरज असताना देखील आम्हाला योजनेमधून बाद का केला आहे आम्हाला पुन्हा पैसे द्या असे देखील प्रतिक्रिया अनेक लाडक्या बहिणींनी व्यक्त केली.
यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी ज्यांनी वेबसाईटवरून अर्ज केले होते परंतु त्यांना जून महिन्या अंतर्गत लाभ मिळाला नाही अशा महिलांनी वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार अथवा आपला कंप्लेंट फॉर्म सबमिट केला होता.
Ladki Bahin Yojana Next Installment Date
या महिलांना मिळणार 3000 रुपये –
तीन हजार रुपये कोणाला मिळणार खरच मिळणार का असे देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत तर ज्या बहिणींनी जून मध्ये त्यांना योजनेचे पैसे मिळाले नसल्यानंतर वेबसाईट वरती जाऊन आपली तक्रार दाखल केली होती किंवा तक्रार फॉर्म सबमिट केला होता त्यानंतर त्याचा रिव्हिव करून ज्यांचे अर्ज स्टेटस Resolved असा दाखवत आहे त्या लाडक्या बहिणींना पुढील महिन्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे एकत्रित लाभ मिळणार आहे.
आता ज्या बहिणींनी तक्रार फॉर्म दाखल केला होता परंतु त्यांच्या फॉर्म तपासल्यानंतर त्यांच्या स्टेटस मध्ये Rejected असं दाखवत आहे त्या लाडक्या बहिणींना योजनेमधून कायमचे बाद केले आहे आणि त्यामुळेच त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
आता अनेक बहिणींचे फॉर्म अजूनही In Review मध्ये दाखवत आहे त्यांनी काही दिवस वाट पाहायची आहे.
