Ladki Bahin May Hafta राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा मे महिन्याचा हप्ता आज पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास यासाठी महिला व बालविकास विभागाकडे महाराष्ट्र अर्थ विभागाकडून सुमारे 335.70 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे हा निधी दिनांक 23 मे रोजी लाडक्या बहिणींच्या महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. यानंतर आजपासून म्हणजेच की दिनांक 27 मे पासून प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता याबाबतची सविस्तर माहिती आपण खाली पाहू शकणार आहात.
Ladki Bahin Yojana May Hafta
मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आल्यापासून लाडक्या बहिणी आम्हाला मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत सर्वत्र चौकशी करत असताना आपण पाहिलं होतं. यामध्येच काही वेळा अनेक माध्यमांद्वारे अथवा यूट्यूब चैनल मार्फत विविध प्रकारच्या चुकीच्या बातम्या देखील येतात ज्यामधून लाडकी बहीण बंद होणार का अशा संदर्भातील माहितीमुळे किंवा बातम्यान मुळे लाडक्या बहिणी काही प्रमाणामध्ये बुचकळ्यात देखील पडतात.
योजना नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,महाराष्ट्र |
मिळणारा लाभ | मासिक 1500 रुपये |
लाभार्थी संख्या | 2.5 कोटी महिला |
मे हफ्ता वितरण तारीख | 27-31 मे 2025 |
मे हफ्ता वितरीत निधी | 335.70 कोटी |
मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणारी आणि महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली योजना म्हणून नावारूप आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या बँक खात्यावरती थेट जमा होत असल्याने विविध महिला यामुळे आपला संसार असेल किंवा इतर बाबींसाठी या निधीचा योग्य पद्धतीने वापर करत आहेत आणि त्यामुळे ही योजना सर्वसमावेशक असल्याचे देखील लाडक्या बहिणीच्या तोंडून येत आहे.
Maharashtra Ladki Bahin Yojana Form
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना म्हणजेच की जुलै 2024 पासून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली होती आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे जाऊन योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज करू शकत होता.
योजनेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी आपले अर्ज केले आणि त्यामुळेच यासाठी परत आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटर मध्ये देखील योजनेचा अर्ज करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आणि यामुळेच जवळपास 03 कोटी होऊन अधिक बहिणींनी अथवा महिलांनी या योजनेसाठी आपले अर्ज केले यामधून जवळपास 2.6 कोटी महिलांचे अर्ज हे पात्र झाले आणि त्यांना योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यास देखील सुरुवात झाली. Ladki Bahin May Hafta
योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाचे अथवा राज्य सरकारचे 2.5 कोटी महिला लक्ष होते परंतु त्याहून अधिक महिला आता लाभ घेत आहेत त्यामुळे या योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया ही सध्या संपूर्णपणे बंद आहे.
नवीन अर्ज प्रक्रिये बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये वरती सांगितल्याप्रमाणे सध्या तरी सरकार या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार करत नसल्याचे महिला व बालविकास विभागाद्वारे सांगण्यात आले आहे. याबाबत विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी देखील नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो आणि बैठकीमध्ये सध्या याबद्दल कुठल्याही प्रकारचा विषय निघाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया लगेच सुरू होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत.
Ladki Bahin Yojana Next Installment Date
लाडकी बहिण मे व जून महिना पैसे एकत्र जमा होणार ?
लाडकी बहीण योजनेचा मे व जून महिन्याचा हप्ता एकत्रित येणार असे देखील काही मीडिया रिपोर्टने सांगितले होते परंतु याबद्दल आता स्पष्टता आली असून यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याबद्दल कुठलाही प्रकारची माहिती नाही आणि जो अधिसूचना अथवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की हा जो हप्ता असणार आहे तो फक्त मे महिन्याचा हप्ता असणार आहे.
आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींना मिळू शकतो तर जून महिन्याचा हप्ता हा दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहिण 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार ?
यासोबतच 2100 रुपयांबद्दल बोलायचे झाल्यास त्या संदर्भातील निर्णय अद्याप झाला असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने अथवा राज्य सरकारच्या वतीने देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. यावर बोलताना आपले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्याचे आर्थिक स्थिती ज्यावेळी चांगली होईल त्यावेळी आम्ही नक्कीच महिलांसाठी दिलेल्या आश्वासन पूर्ण करून त्यांना पंधराशे रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये महिना आम्ही नक्कीच करू.
Ladki Bahin Yojana यादी Maharashtra
लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी कशी पहावी ?
मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न असतो की लाडकी पण योजनेची लाभार्थी यादीत गावनिहाय लाभार्थी यादी आम्ही कसे पाहायचे, तर याबद्दल बोलायचे झाल्यास लाडकी बहीण योजनेसाठी सध्या कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन पोर्टल अथवा वेबसाईट सुरू नाही आणि त्यामुळे तुम्ही सध्या तरी यासाठी गावनिहाय पात्रता यादी अथवा लाभार्थी यादी पाहू शकत नाही.
आता मग मिळणारा आपला कोणाला मिळणार हे कसे समजायचे ते लक्षात घ्या लाडकी बहिण योजनेसाठी राज्य सरकार द्वारे काही अटी आणि निकष देण्यात आले होते त्या निकषांमधून जे उमेदवार अथवा ज्या महिला पात्र आहेत त्यांना योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यापर्यंत पैसे जमा करण्यात आले आहेत आणि त्यांना मे महिन्याचा हप्ता देखील सुरळीतपणे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे.Ladki Bahin May Hafta
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत :
- योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 65 वयोगटातील असावे.
- लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे.
- महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा निवृत्ती वेतनधारक नसावी.
- लाभ घेणारी महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेणारी नसावी.
- लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेणारी महिला आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- लाभ घेणाऱ्या महिनेच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती खासदार, आमदार अथवा जिल्हा परिषद सदस्य नसावे.
- लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी.
- एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र
लाडकी बहिण योजना पैसे येत नसल्यास करा हे महत्वाचे काम :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेचे पैसे अथवा लाभ मिळत नाही आता त्याबद्दल माहिती घेतली असता असे समोर येत आहे की योजनेसाठी राज्य सरकार द्वारे लाभ हा फक्त डीबीटी द्वारे वितरित केला जातो. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत पैसे द्यायचे आहेत त्यांना केवळ त्यांच्या आधार कार्डशी संलग नसलेल्या बँक खात्यावरतीच सरकार पैसे ट्रान्सफर करते, आणि यामुळेच ज्या महिलांचे आधार सीडिंग अथवा डीबीटी मध्ये बँकेत प्रॉब्लेम आहे अशा महिलांना किंवा लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे वितरित करताना सरकारला अडचणी येतात आणि परिणामी योजनेचा लाभ पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना मिळत नाही.
आधार DBT असलेल्या अडचणी दुरुस्त कशा कराव्या ?
तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला देखील आधार डीबीटी अथवा आधार सीडिंग संदर्भात अडचण असल्यास तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होत आहेत अथवा तुम्हाला ज्या बँकेमध्ये हे पैसे हवे आहेत त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे आधार सीडिंग करून घ्यायचे आहे. या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांमध्ये बँक सर्व प्रोसेस करेल आणि त्यानंतर तुमचे अडचणी दूर होऊन तुम्हाला योजनेअंतर्गत पुढील सर्व हप्ते मिळणार आहेत.Ladki Bahin May Hafta