Ladki Bahin May 2025 Installment Date : लाडक्या बहिणींना मे हफ्ता यादिवशी 100% जमा होणार

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin May 2025 Installment Date तर लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याच्या वारंवार विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या तारखा येत आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत नाहीत.

योजनेसाठी दिनांक 23 मे 2025 रोजीच आपले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की येत्या दोन-तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होते आणि त्यासाठी त्याच दिवशी 335 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु तरीदेखील लाडक्या बहिणींना मात्र अजूनही पैसे जमा झाले नाहीत.

आता या योजनेबद्दल काल पुन्हा एकदा राज्य सरकार द्वारे नवीन शासन निर्णय अथवा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि यानुसार आता लाडक्या बहिणींना पैसे कधी जमा होणार याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

Ladki Bahin May Mahina Hafta Kadhi Yenar ?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांमध्ये एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षे मध्ये आता सर्व लाडक्या बहिणी आहेत. योजनेअंतर्गत आजवर एप्रिल महिन्याचा पकडून लाडक्या बहिणींना 10 हप्ते जमा झालेले आहेत.

अकराव्या म्हणजेच की मे महिन्याच्या हप्त्याबद्दल आता लाडक्या बहिणी विचारत आहेत की पैसे कधी जमा होणार कारण मे महिना संपायला आता जेमतेम दोन दिवस उरले आहेत आणि या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार का नाही असा देखील प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज एका कार्यक्रमांमध्ये लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची माहिती आणि अपडेट दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील लाडक्या बहिणींना मार्गदर्शन केले आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजना काही जरी झालं तरी आम्ही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणीसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही निधी कमी पडू देणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देखील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे देखील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

Ladki Bahin Yojana New Form 2025

मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना जमा होणार असला तरी देखील राज्यातून अजून अशा अनेक महिला आहेत ज्यांचं मत आहे की आम्ही या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहोत परंतु आम्ही काही कारणास्तव अथवा कागदपत्रांची पूर्तता नसल्याने योजनेसाठी आम्ही आमचा अर्ज करू शकलो नाही.

तर आम्हाला पुन्हा एकदा या योजनेसाठी अर्ज करायचा आहे सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी कारण आम्ही गरजू आहोत आम्हाला या योजनेतून मिळणाऱ्या निधीची सक्त गरज आहे परंतु आता आम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येत नाही आणि परिणामी आम्ही या लाभापासून वंचित आहोत.

नवीन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्यांच्याकडून देखील याबद्दल लगेच कुठल्याही प्रकारची अपडेट देता येणार नाही कारण सरकारचे जे २.५ कोटी महिला एक लक्ष होते ते पूर्ण होऊन त्याहून अधिक महिला या योजनेअंतर्गत सध्या पात्र असून लाभ देखील घेत आहेत.Ladki Bahin May 2025 Installment Date

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update

Ladki Bahin Yojana Apatra Yadi Kashi Pahaychi

मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडून अथवा मंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते की ही योजना ही गरजूंसाठी आहे ज्या महिलांना खरंच गरज आहे त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले होते. योजनेसाठी सुरुवातीला अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर यामध्ये काही अटी व निकष देखील देण्यात आले होते त्यासोबतच अर्ज करत असताना महिलांकडून हमीपत्र देखील घेण्यात आलेले होते.

परंतु ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेमध्ये बहिणींना नाराज नाही करण्यासाठी सरकारकडून योजनेमध्ये अर्ज केलेल्या जवळपास सर्वच महिलांचे अर्ज स्वीकारले गेले ज्यामधील अटी व निकषांची तपासणी अथवा कागदपत्रांची देखील पडताळणी केली गेली नसल्याचे देखील समोर आले. आणि या कारणामुळेच अनेक नोकरदार महिला असतील, उद्योजक कुटुंबातील महिला असतील, आयकर भरणाऱ्या महिला असतील, चांगले उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला असतील अशा विविध काही ठिकाणी महिलांच्या नावाने पुरुष देखील लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले होते.

आणि त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा पडताळणी सुरू केली आणि जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांना या योजनेअंतर्गत बाद केले आणि जे बाद केले त्या सर्वांचे मागील काही हप्ते हे बंद झालेले आहेत.सध्या या योजनेसाठी वेबसाईट असेल अथवा पोर्टल असेल किंवा मोबाईल ॲप्लिकेशन सर्व काही बंद आहे त्यामुळे तुम्ही अपात्र यादी या ठिकाणी पाहू शकणार नाही परंतु तुम्हाला हप्ते येत नसल्यास तुम्हाला योजनेमधून बाद केले गेल्याची दाट शक्यता असणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana June Hafta List लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी या महिलांना जमा होणार 3000 रुपये यादी आली | Ladki Bahin Yojana June Hafta List
Ladki Bahin Yojana Yadi Maharashtra pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत :

  • योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 65 वयोगटातील असावे.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे.
  • महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा निवृत्ती वेतनधारक नसावी.
  • लाभ घेणारी महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेणारी नसावी.
  • लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेणारी महिला आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • लाभ घेणाऱ्या महिनेच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती खासदार, आमदार अथवा जिल्हा परिषद सदस्य नसावे.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी.
  • एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.

लाडकी बहिण 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार ?

यासोबतच 2100 रुपयांबद्दल बोलायचे झाल्यास त्या संदर्भातील निर्णय अद्याप झाला असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने अथवा राज्य सरकारच्या वतीने देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. यावर बोलताना आपले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्याचे आर्थिक स्थिती ज्यावेळी चांगली होईल त्यावेळी आम्ही नक्कीच महिलांसाठी दिलेल्या आश्वासन पूर्ण करून त्यांना पंधराशे रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये महिना आम्ही नक्कीच करू.Ladki Bahin May 2025 Installment Date

हे पण वाचा:
DMER Bharti 2025 वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | DMER Bharti 2025

2100 रुपयांबद्दल बोलायचे झाल्यास आपले अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील या पद्धत सांगितले की कोणतेही सोंग आणता येते परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती ही गंपत आहे आणि त्यामुळे लगेच आपण याबद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही परंतु येत्या काळामध्ये आम्ही यासाठी देखील लवकरच अंमलबजावणी करून लाडक्या बहिणींना जो आम्ही शब्द दिला होता तो नक्कीच पूर्ण करू.

लाडकी बहिण नवीन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin May 2025 Installment Date
Ladki Bahin Yojana Loan Online Apply

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना अथवा बहिणींना व्यवसाय करण्यासाठी त्यांचा स्वतःचा छोटा उद्योग उभा करण्यासाठी बँकांशी बोलणी सुरू आहेत आणि या माध्यमातून बहिणींना 30-40 हजार रुपये रक्कम एक रकमी द्यायची आणि त्यानंतर त्यांचे लाडकी बहिण योजनेचे जसजसे हप्ते जमा होतील त्यातून त्यांचा हप्ता बँक कट करून घेईल आणि अशा पद्धतीने त्यांना कर्ज देण्यात येईल.

आता या योजनेबद्दल सर्वत्र चर्चा सुरू असून लवकरच या योजनेची देखील आम्ही अंमलबजावणी करू आणि अंमलबजावणी केल्यानंतर या योजनेसाठीचा शासन निर्णय आम्ही प्रसिद्ध करू आणि लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी देखील यापुढे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देखील त्या ठिकाणी सांगितले.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment List लाडकी बहिण जून हफ्ता आला नाही ? करावे लागणार हे महत्वाचे काम येणार पैसे | Ladki Bahin June Installment List

Leave a Comment

Join Whatsapp Group !