Ladki Bahin Loan Yojana नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून आणि आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार द्वारे त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज दिले जाणार आहे.
आता हे कर्ज नक्की कोणत्या लाडक्या बहिनींना मिळणार तसेच या कर्जासाठी अर्ज कसा करायचा याची प्रक्रिया काय असणार आहे याबद्दल विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत. आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने देखील या योजनेबद्दल महिलांना माहिती देण्यात आलेली आहे आणि तीच आपण आज पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana 2025 Maharashtra Loan
विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली आणि राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाणारी योजना अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि या योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना सुमारे 11 हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले आहेत.
आता जून महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहेत आणि त्यासोबतच जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी छोटा मोठा उद्योग सुरू करता यावा म्हणून त्यांना योजना अंतर्गतच एक रकमी त्यांच्या व्यवसायानुसार तीस हजार अथवा 40 हजार रुपये त्यांना कर्ज स्वरूपात देणार आहे. आणि जसे जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या संबंधित महिलेचे पैसे जमा होणार आहेत तसेच ही कर्जाची रक्कम त्या ठिकाणी संबंधित बँक कट करून घेणार आहे आणि या स्वरूपाने ही योजना चालणार आहे.
Ladki Bahin Yojana Loan Scheme 2025
लाडकी बहिण योजना कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ?
आता यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कर्ज घ्यायचे असल्यास म्हणजेच की ज्या बहिणींना अथवा महिलांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज हवे असल्यास त्यांनी अर्ज कुठे करायचा तर यासाठी सरकार लवकरच एक शासन निर्णय प्रकाशित करणार आहे आणि त्यानुसार मग कोणत्या बँकेमधून हे कर्ज मिळणार आहे किंवा कोण कोणत्या बँक ही प्रकरण करायला तयार असणार आहे याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे.
याचा अर्थ असा होतो की या योजनेची घोषणा झालेली आहे मात्र अजून या योजनेअंतर्गत अंमलबजावणीची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू केली नाही परंतु येत्या काही दिवसातच या योजनेची देखील अंमलबजावणी सरकार द्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.Ladki Bahin Loan Yojana
Ladki Bahin Yojana June Hafta Date
लाडकी बहिण योजना कर्ज घेतल्यास त्याला किती व्याज असणार ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे व्यवसाय लोन अथवा कर्ज दिले जाणार आहे त्याला बँका किती व्याजदर घेणार हा देखील प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे तर याबद्दल देखील ही रक्कम बिनव्याजी देण्याचे सरकारचे धोरण असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की यासाठी जे काही व्याजदर असणार आहे ते बँकेला सरकारद्वारे दिला जाईल.
आणि लाडक्या बहिणीकडून यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नसल्याचे बोलले जात आहे परंतु हे ज्यावेळी अधिसूचना अथवा शासन निर्णय प्रकाशित करण्यात येणार आहेत त्याचवेळी आपल्याला याची खात्री देता येणार आहे कारण जोवर अंमलबजावणी प्रक्रिया होत नाहीत तोपर्यंत या संदर्भात कुठलीही खात्रीशीर माहिती देत आहेत नसते.
लाडकी बहिण जून महिन्याचे पैसे कधी येणार ?

मे महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता जून महिन्याचे पैसे कधी येणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत तर याबद्दल बोलायचे झाल्यास जून महिन्याच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यामध्ये या योजनेचा हप्ता सर्व लाभार्थी आणि पात्र बहिणींना जमा होणार आहे याबाबत सरकारकडून लवकरच प्रक्रिया केली जाईल आणि महिना संपायच्या आधी योजनेचा हप्ता जमा होईल असे देखील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगितले जात आहे.Ladki Bahin Loan Yojana