Ladki Bahin June Installment राज्यातील सर्वात महत्त्वांच्या योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणी आहेत जून महिन्याचे पैसे कधी येणार त्यासोबतच येणारा हप्ताह पंधराशे रुपये असणार की 1750 रुपये असणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारात आहेत.
कारण मागील काही दिवसांपूर्वी यामध्ये बातमी आली होती की लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाडकी ला दिलेला लाभ आता वाढ करण्यात आली असून पुढील हप्त्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशात 250 रुपये जास्त येणार आहेत आणि त्यामुळे मिळणारा हप्ता किती रुपये प्रमाणे जमा होणार आहे याची देखील चौकशी सर्व लाडक्या बहिणी करत आहेत त्याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती आज घेऊया.
Ladki Bahin Yojana June Hafta List
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. जून महिन्याच्या हप्त्याची संपूर्ण प्रक्रिया झाली असून यामध्ये यादी देखील फायनल करण्यात आली असून योजनेचे पैसे राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे.
यासोबतच ज्या महिलांना मागील एक दोन हप्ते आले नाहीत आणि त्यापैकी ज्या महिलांनी आता त्यांच्या बँकेचा असणारा जो काही प्रॉब्लेम होता ज्यामध्ये केवायसी असेल, आधार बँक लिंक असेल अशा सर्व अडचणी दुरुस्त करून घेतले आहेत त्यांना देखील आता डीबीटी द्वारे पैसे मिळवण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याने त्यांनाही योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याने लाडक्या बहिणीसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे.
Ladki Bahin Yojana June Hafta Date
लाडकी बहिण जून महिना हफ्ता कधी जमा होणार ?
लाडकी बहीण जून महिन्याच्या हप्त्याच्या तारखे बद्दल बोलायचे झाल्यास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याबद्दल सांगण्यात आले होते की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हात जून महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात येईल याचा अर्थ 30 जून च्या आधी सर्व पात्र आणि लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत.
मित्रांनो या आधी देखील ज्या ज्या वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण झाले आहे त्या प्रत्येक वेळी आपण पाहिले आहे की सर्व लाभार्थी महिलांना पैसे जमा होण्याकरता चार-पाच दिवसांचा कालावधी जातो.
आणि त्यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा केले जाणार असल्याने योजनेअंतर्गत येत्या एक-दोन दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण सुरू होईल आणि त्यानंतर चार-पाच दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यभरातून ज्या सर्व महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतात त्या सर्वांना योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana 12th Installment Date
लाडकी बहिण योजना पैसे वाढले येणारा हफ्ता 1750 रुपये मिळणार का ?
आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागील दोन-तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती त्या बातमीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे पैसे वाढले 250 रुपयांनी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ झाल्याचे देखील आपण पाहिले होते.
याबद्दल अधिक ची माहिती घेतली असता हे पैसे वाढ झाले आहे परंतु हे मध्य प्रदेश या राज्यासाठी आहे मध्य प्रदेश राज्यांमध्ये देखील लाडली बहना योजना या नावाने लाडकी बहीण योजनेसारखीच एक योजना सुरू आहे आणि त्या सरकारने या योजनेच्या लाभांमध्ये आता वाढ करण्याची घोषणा केली आहे.

आता मध्य प्रदेश सरकारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून देखील लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकांमध्ये आश्वासन दिले होते आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ हे आश्वासन देखील सरकार कधीपर्यंत पाळणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.