लाडकी बहिण जून महिन्याचा हफ्ता या महिलांना नाही मिळणार लाखो महिला अपात्र | Ladki bahin June Hafta List

WhatsApp Group Join Now

Ladki bahin June Hafta List नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षपूर्ती आणि म्हणजेच बारावा हप्ता जून महिन्यांतर्गत आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि हा हप्त्यासाठी आता सरकारद्वारे आणि महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे प्रक्रिया देखील सुरू करण्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे.

परंतु हप्त्याच्या आधीच अनेक लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणावर धक्का असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिला आहेत की ज्यांना आता जून महिन्यांतर्गत पैसे दिले जाणार नाहीत आता हे पैसे कोणाला मिळणार नाहीत तसेच तुम्हाला पैसे मिळावे यासाठी काय करावे लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.

Ladki Bahin Yojana June Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे यासाठी अद्याप अधिकृत तारीख जरी जाहीर केली नसली तरी देखील जून महिन्याच्या आधी म्हणजेच की 30 जून च्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील असे महिना व बाल विकास विभागाच्या द्वारे बोलले जात आहे.

म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्येच या योजनेअंतर्गत हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई देखील केली जाणार नाही योजनेसाठी वर्षभराचा निधी आधीच उपलब्ध करून दिला आहे ज्यामुळे हप्ता वितरणासाठी अडचण येणार नसल्याचे देखील बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana Apatra List June

या लाडक्या बहिणींना नाही मिळणार जून महिन्याचे पैसे –

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापासूनच विविध महिलांची पडताळणी सुरू आहे कारण यामध्ये असे निदर्शनात आले होते की अनेक अशा महिला आहेत की ज्या अटी व निकषांच्या विरोधात जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी महिला होत्या त्यासोबतच इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला असतील तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिला असतील किंवा चार चाकी वाहनधारक महिला असतील. Ladki bahin June Hafta List

आणि त्यामुळेच ज्या ज्या खात्यांची पडताळणी सुरू आहेत आणि ज्या खात्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे निष्पन्न होत आहे अशी सर्व खाती लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद केली जात आहेत. म्हणजेच की योजनेअंतर्गत लाखो अशा महिला आहेत की ज्यांना आता जून महिन्याचा देखील लाभ दिला जाणार नाही.

Ladki Bahin Yojana 12th Installment Date

लाडकी बहिण योजना पैसे बंद होऊ नये म्हणून लगेच करा हे काम –

लाडक्या बहिणींनो तुम्हाला देखील तुमचे योजना चे पैसे बंद होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असणार आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बँक खाते रीकेवायसी साठी आले आहे का हे तुम्हाला बँकेत जाऊन तपासावे लागणार आहे. Ladki bahin June Hafta List

मागील एक दोन महिन्यांपासून अनेक अशी बँक खाते आहेत ज्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्या कारणाने त्यांचे आधार आणि बँक अकाउंट ऑनलाइन ऍक्टिव्हेट दाखवत नाही आणि हे ऍक्टिव्हेट न दाखवल्याने त्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत आणि परिणामी अशा अनेक महिला आहेत की ज्यांना मार्च महिन्यापासूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

Ladki bahin June Hafta List
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !