लाडकीला आनंदाची बातमी जून महिना हफ्ता आजपासून 3600 कोटी वितरीत | Ladki Bahin June Hafta Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात आनंदाची बातमी आहे कारण मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तोच लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आज पासून सर्व पात्र आणि लाभार्थी बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आता योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असणार किंवा 2100 रुपये असणार त्यासोबतच जून आणि जुलै महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना आहे त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana June Installment

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून पार पडत आहे आणि याच्या पूर्वसंध्येला काल महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्ता संदर्भात प्रश्न विचारला गेला.

यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे द्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले की लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकार द्वारे महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 3600 कोटी रुपयांचा निधी आजच वर्ग करण्यात आला आहे.

हे पण वाचा:
SBI Bharti 2025 स्टेट बँक अंतर्गत 0996 जागा पदवीधरांना नोकरी पगार 35 हजार | SBI Bharti 2025

एवढेच नाही तर उद्यापासूनच म्हणजेच की दिनांक 30 जून 2025 पासून लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana June Hafta List

आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की जमा होणारा हप्ता जो आहे तो फक्त जून महिन्याचा असणार आहे त्याच्यामुळे जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रित येणार हे जे बोललं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तथ्य नाही.

यासोबतच जून महिन्याचा लाभ देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार आहे 2100 रुपयांबद्दल राज्य सरकार द्वारे अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाही.

हे पण वाचा:
SSC GD Bharti 2025 SSC मेगाभरती 25487 जागा 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | SSC GD Bharti 2025

ज्या बहिणींना मागील दोन-तीन हप्त्यांपासून पैसे आले नव्हते ज्यांचे बँकेच्या काही अडचणी अथवा तांत्रिक बाबी असल्याने त्यांना योजनेचे पैसे वर्ग करता आले नव्हते आता त्या देखील महिलांना ज्यांनी त्यांच्या बँकेतील ज्या काही अडचणी होत्या किंवा ज्या काही दुरुस्ती होत्या त्या सर्व करून घेतल्या आहेत त्यांना मागील दोन महिन्यांपासूनचे आणि त्यासोबतच जून महिन्याचा देखील हप्ता त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग केला जाणार आहे.Ladki Bahin June Hafta Date

Ladki Bahin June Hafta Date
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !