अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता GR आला | Anganwadi Protsahan Bhatta 2025

WhatsApp Group Join Now

Anganwadi Protsahan Bhatta 2025 राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांची अथवा मदतनीस यांची जी मागणी होती त्या मागणीला अनुसरून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.

आणि या निर्णयामुळेच आता सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे या संदर्भातील शासन निर्णय देखील आज दिनांक 25 जून 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्याची अधिसूचना अथवा शासन निर्णयाची प्रत देखील तुम्ही खाली पाहू शकणार आहात ज्यामध्ये प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने घेतला गेला आहे.

Anganwadi Bhatta 2025 Maharashtra

तर मित्रांनो याबद्दलची माहिती आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून दिली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसारच शासनाने विहित केलेल्या जे काही निकष असतील त्यांना अनुसरून सर्व अंगणवाडी सेविकांना दिनांक 01 ऑक्टोबर 2024 पासूनच प्रोत्साहन भत्ता अनुदनेय करण्यात आलेला आहे.

आणि हा महत्त्वाचा निर्णय राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अधिक समर्पित भावनेने सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल असा मला विश्वास देखील आहे असे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

Protsahan Bhatta Anganwadi Maharashtra 2025

तर मित्रांनो हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे ज्यामध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका यांची 110669 तर अंगणवाडी मदतनीस यांची 110669 अशी एकूण 221338 मानधनी तत्त्वावरील पदे मंजूर आहेत.

आता यासाठी प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणी मध्ये सुधारणा देखील करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय देखील महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ताकरिता ऑक्टोबर २०२४ पासूनच सरकारने मंजुरी दिली.

Maharashtra Anganwadi Bhatta 2025 Notification

अंगणवाडी सेविकांसाठी निकषानुसार पात्र असणाऱ्यांना रुपये 1400 ते रुपये 2000 प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी देखील निकषांनुसार रुपये 700 ते रुपये 1000 प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

यासाठीचा शासन निर्णय आणि निकषांची माहिती देखील तुम्ही खाली दिलेल्या शासन निर्णयामध्ये पाहू शकणार आहात आणि हा शासन निर्णय यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील म्हणजेच की ज्या अंगणवाडी सेविका पात्र असतील त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

Anganwadi Protsahan Bhatta 2025
योजना शासननिर्णय (GR) पाहण्यासाठीक्लिक करा
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !