Ladki Bahin Loan Yojana Maharashtra नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज मिळणार याबाबतची घोषणा झाली होती परंतु या योजनेसाठी अंमलबजावणीची प्रक्रिया मात्र होत नसल्याने कधीपासून आम्हाला योजनेसाठी कर्ज मिळणार तसेच यासाठी अर्ज कसा करायचा अशा अनेक चौकशा लाडक्या बहिणी करत होत्या.
आता मात्र सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण अखेरीज लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी 30-40 हजार नव्हे तर तब्बल 01 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे आणि योजनेची अंमलबजावणी देखील आता करण्यात आलेली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Karj Form
मित्रांनो लाडक्या बहिणींना आता बिनव्याजी कर्ज मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया देखील आता तुम्ही करू शकता. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने याआधीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी 09% व्याज दराने व्यवसायासाठी कर्ज देण्याचे धोरण आखले होते आणि त्याची घोषणा देखील केली होती.
परंतु लाडक्या बहिणींना कर्ज स्वरूपात रक्कम देऊन त्यावर व्याज आकारणी योग्य नसल्याचे अनेकांचे मत असल्याने मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज स्पष्टपणे सांगितले की या योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देणार आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार अथवा व्याज घेतले जाणार नाही.
Ladki Bahin Yojana Loan Application 2025
मित्रांनो याबद्दल बोलताना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत परताव्याची लाडक्या बहिणींना संलग्न केले जाणार आहे त्यामध्ये राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध योजना जसे की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे किंवा भटक्या विमुक्तांसाठी वसंतराव नाईक महामंडळ असेल त्यासोबतच ओबीसी महामंडळ असतील या सर्व मंडळांची लाडक्या बहिणींना संलग्न केले जाणार आहे.Ladki Bahin Loan Yojana Maharashtra
जेणेकरून यामधील व्याज परतावा हा लाडक्या बहिणींना त्वरित दिला जाणार आहे आणि त्यामुळे त्यांना मिळणारी जी रक्कम असणार आहे त्यांच्या व्यवसायासाठी दिली जाणारी रक्कम ही शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra Loan Scheme 2025
आता याचे स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांना काही बँक आहेत की ज्या शून्य टक्के व्याजदराने शेती कर्ज देतात त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना देखील व्यवसायासाठी हे कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आणि ज्या दिवशी लाडक्या बहिणी त्यांच्या व्याजाचा हप्ता भरतील त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक खात्यावरती पुन्हा एकदा हे व्याज परत केले जाणार असे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि तसेच भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलताना सांगितले.
तसेच यामध्ये समूहाने अथवा गटाने जर महिला एकत्र आल्या तर एका महिलेला एक लाख रुपये याप्रमाणे जर दहा महिलांनी एकत्रित येऊन व्यवसाय करायचे ठरवले तर त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुमारे दहा लाख रुपये कर्ज स्वरूपात देणार आहे ज्यामुळे लाडक्या बहिणी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार असून चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय देखील उभा करून आपल्या कुटुंबास हातभार लावतील हाच या योजनेमागचा मूळ उद्देश उठण्याचे देखील त्यांनी सांगितले.Ladki Bahin Loan Yojana Maharashtra
