Ladki Bahin Yojana June Hafta Date लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याबाबत सर्व लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत जून महिन्याचे पैसे कधी पर्यंत जमा होणार ? कारण मे महिना असेल अथवा जून महिना या दोन्ही महिन्यांचे पैसे जून महिन्यातच लाडक्या बहिणींना मिळणार का की मागच्या दोन महिन्यांप्रमाणे यावेळी देखील हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होऊन हा हप्ता जुलै महिन्यामध्ये मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत तर याबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana June Installment
नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना राज्यामध्ये मागील वर्षी राबवली गेली आणि या योजनेने महाराष्ट्राचं राजकारण संपूर्ण बदलून टाकलं. लोकसभेवेळी महाविकास आघाडीला राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका वेळी देखील असेच काही होईल असे चित्र असतानाच महाराष्ट्र राज्य सरकारच्या द्वारे महिलांना थेट आर्थिक लाभ म्हणून मध्य प्रदेश सरकारने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य द्वारे देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.
योजना सुरू झाल्यापासून आजवर या योजनेमधील सर्व लाभार्थी व पात्र महिलांना सुमारे 11 हप्ते 1500 रुपयांप्रमाणे जमा केले आहेत आणि आता बारा वा हफ्ता अर्थातच जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana New Registration Process
लाडकी बहिण योजना नवीन अर्ज कसा करायचा ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया मागील वर्षीच बंद करण्यात आली आहे आणि त्यानंतर आपण पाहत आहे की अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत तिच्या या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत ज्या गरीब आहेत अथवा गरजू देखील आहेत परंतु तरी देखील त्यांना योजनेसाठी अर्ज करता येत नाही.
योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्यांच्याकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सध्या तरी या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया बद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान यासंदर्भात ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी कदाचित योजनेसाठी पुन्हा एकदा ज्या महिला अर्ज करायच्या बाकी आहेत आणि पात्र आहेत त्यांना एक संधी देण्याची शक्यता आहे,परंतु तूर्तास मात्र योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाईन अथवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकत नाही.Ladki Bahin Yojana June Hafta Date
Ladki Bahin Yojana Maharashtra June Hafta Date
आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की योजनेसाठी जून महिना संपायच्या आधी पैसे जमा होतील म्हणजेच की साधारणपणे 30 जून पर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.

आता मिळणारा हप्ता २१00 रुपये असणार की पंधराशे रुपये असणार हा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींचा आहे तर मिळणारे पैसे हे 2100 रुपये नसून पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार आहेत कारण 2100 रुपयांबद्दल अद्याप कुठलाही प्रकारचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेलं नाही. ज्यावेळी लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामधून महिला बाध होणार आहेत आणि त्यानंतर कदाचित योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा निर्णय घेऊन सर्व पात्र महिलांना हे पैसे त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील.Ladki Bahin Yojana June Hafta Date