Gharkul Gramin Yojana 2025 Maharashtra : घरकुल पीएम आवास योजना 🏠 2.10 लाख रु.लगेच करा तुमचे अर्ज

WhatsApp Group Join Now

Gharkul Gramin Yojana 2025 Maharashtra मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आणि संपूर्ण देशभरातील गोरगरिबांना आणि गरजूंना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून विविध प्रकारच्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे राबवल्या जातात. यामध्ये पीएम आवास योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल अशा विविध प्रकारच्या योजना आणि त्यांच्याद्वारे हक्काचे घर बांधण्यासाठी नागरिकांना एक ठराविक रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते.

यामधील सर्वाधिक नावाजलेली आणि अर्थसहाय्य देणारी योजना म्हणजेच केंद्र सरकार द्वारे संचलित पीएम आवास योजना. पीएम आवास योजनेच्या 2025 साठी सर्व्हे अर्थात नोंदणी प्रक्रिया सुरू असून यासाठी मुदत वाढ मिळाली होती आणि आता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. या योजनेबाबतची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत, आवश्यक असणारे कागदपत्र आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

PM Awas Gramin Yojana 2025 Maharashtra

मित्रांनो पीएम आवास योजनेअंतर्गत दरवर्षी संपूर्ण देशभरात नागरिकांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते या अर्थसहाय्यांमध्ये 2025 यावर्षीपासून राज्य सरकार द्वारे देखील वाढ करण्यात आलेली असून यापुढे मंजूर होणाऱ्या घरकुलांना सरकारकडून 2.10 लाख रुपये टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

पीएम आवास योजनेसाठी संपूर्ण देशभरातून इच्छुक लाभार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपले अर्ज करत असतात त्यानंतर त्या अर्जांची पडताळणी केली जाते आणि योग्य माहिती असलेल्या गरजू व्यक्तींना घरकुल मंजूर केले जाते आणि त्यानंतर त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती योजनेचे हप्ते जमा केले जातात.

योजनेचे नावपीएम आवास योजना 2025
योजना विभागकेंद्र आणि राज्य सरकार
मिळणारा लाभ02 लाख 10 हजार रुपये
अर्जाची अंतिम मुदत31 मे 2025

घरकुल बद्दल बोलायचे झाल्यास आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी बोलताना सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण देशभरात येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सुमारे 02 कोटी घरकुलांची निर्मिती करणार असून येत्या काही वर्षांमध्ये देशभरामध्ये जवळपास सर्वच नागरिकांकडे हक्काचे घर असणार आहे. घरकुल योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर घरांची देखील निर्मिती होत असल्याचे मागील काही वर्षापासून आपण पाहत आहे आणि हीच प्रक्रिया आता व्यापक करून अधिकाधिक लाभ देण्याचे उद्देश यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार द्वारे ठेवण्यात आलेला आहे.Gharkul Gramin Yojana 2025 Maharashtra

Gharkul Gramin Yojana 2025 Amount Maharashtra

घरकुल योजना पीएम आवास साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

मित्रांनो पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील आता तुमचा सर्वे नोंदवू शकता यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला आवास प्लस आणि आधार फेस आरडी या दोन एप्लीकेशन ला डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर या दोन्ही एप्लीकेशन वरून तुम्ही योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकणार आहात.याबद्दल सविस्तर प्रक्रिया खाली तुम्ही पाहू शकणार आहात.Gharkul Yojana form

पीएम आवास योजना घरकुल लाभ घेण्यासाठी पात्रता –

  • अर्ज करणाऱ्या कुटुंबाकडे अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती तीन अथवा चार चाकी वाहन नसावे.
  • पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबाकडे तीन अथवा चार चाकी उपकरण देखील नसावे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी अथवा निवृत्ती वेतनधारक नसावा.
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या नावावरती किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेणारे कुटुंब पात्र नसणार आहे.
  • आयकर अथवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे कुटुंब देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
  • शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंब असल्यास ते देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही.
  • व्यावसायिक अथवा इतर कर भरणारे कुटुंब असल्यास ते देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
  • लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणारा नसावा अन्यथा तो अपात्र होईल.

पीएम आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप –

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update

योजनेच्या लाभाबद्दल अथवा स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला तुम्हाला या योजनेसाठी तुमची नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर घरकुल मंजूर झाल्यास अथवा तुमचा अर्ज स्वीकारल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे अथवा ग्रामपंचायत द्वारे याबद्दलची माहिती मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 15000 रुपयांचा पहिला हप्ता तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती डीबीटीमार्फत जमा केला जाईल.

पहिला हप्ता झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर तुमच्या घराचे झालेल्या कामाचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढील हप्ता 70000 रुपयाप्रमाणे जमा केला जातो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला हीच प्रक्रिया करावी लागते आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील तुम्हाला 70000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. या योजनेसाठी सुरुवातीला 1.50 लाख रुपये मदत सरकारच्या वतीने केली जात होती परंतु यामध्ये आता राज्य सरकार द्वारे वाढ करण्यात आलेले असून तुम्हाला 2.10 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे.

🏠घरकुल योजना अधिकच्या माहितीसाठी👉येथे क्लिक करा
योजना व नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा

Gharkul Gramin Yojana 2025 Apply Online

घरकुल पीएम आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया –

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana June Hafta List लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी या महिलांना जमा होणार 3000 रुपये यादी आली | Ladki Bahin Yojana June Hafta List

मित्रांनो वरती सांगितल्याप्रमाणे यासाठी तुम्हाला दोन मोबाईल ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे हे दोन्ही एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्यायचे आहेत.

  • आता यामध्ये सर्व अर्ज तुम्ही हा आवास प्लस या ॲप्लीकेशन वरूनच भरणार आहात परंतु तुम्हाला सुरुवातीला यामध्ये तुमचा चेहरा अथवा तुमचा फेस स्कॅन केला जातो आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होत असते म्हणून आधार फेस आरडी या ॲप्लिकेशनचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर होतो.
  • आवास प्लस एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला वरती सेल्फ सर्वे या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर खालील दिलेल्या चौकोनामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि खालील बटनावर क्लिक करायचा आहे.
  • हे झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ऑटोमॅटिकली कॅमेरा चालू होऊन त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि तुमचे डोळे उघडझाक करायचे आहेत जेणेकरून तुमचा चेहरा व्यवस्थित पद्धतीने स्कॅन केला जाणार आहे.
  • स्कॅन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव आणि केवायसी सक्सेसफुल झाल्याचा मेसेज देखील येणार आहे त्याखाली ओके बटनावर क्लिक करून तुम्हाला चार अंकी पिन तयार करावा लागणार आहे.
  • पिन तयार केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म पिन म्हणजे खाली देखील तुम्ही वर जो पिन टाकला तोच पिन टाकायचा आहे.
  • त्यानंतर पुढे तुमचा फॉर्म ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य असेल त्यानंतर तुमचा जिल्हा असेल तुमचा तालुका आणि तुमचं गाव ही माहिती निवडायची आहे.
  • पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऍड आणि एडिट सर्वे या बटनावर क्लिक करायचे आहे आता तुम्ही तुमचा सर्व याठिकाणी भरणार आहात यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर देखील टाकणे बंधनकारक असणार आहे.
  • खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर, तुमची कास्ट मोबाईल नंबर यांसारखी माहिती भरावी लागणार आहे ती सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने भरायचे आहे.
  • पुढील प्रक्रिया तुम्हाला तुमच्या घरातील म्हणजेच कुटुंबातील सदस्य किती आहेत रेशन कार्ड नुसार हे सर्व माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि सर्व सदस्य त्या ठिकाणी भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस करायचे आहे.
  • यानंतर पुढे तुम्ही सध्या राहत असलेल्या घराचा प्रकार म्हणजेच की तुमचे घर कच्चे आहे की पक्के आहे, तुमच्याकडे संडास बाथरूम आहे का अशी जी माहिती असणार आहे ती माहिती तुम्हाला सर्व भरायची आहे.
  • यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तुमचे जे सध्याचे घर आहे म्हणजेच की जुने घर तिथे तुम्ही राहता त्या घराचा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने फोटो काढायचा आहे आणि तो फोटो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे.
  • जुन्या घराचा फोटो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ज्या जागेवर तुम्ही नवीन घर बांधणारा आहात त्या जागेचा देखील फोटो काढायचा आहे.
  • हा फोटो काढून झाल्यानंतर तुम्हाला पुढे दोन-तीन प्रकारचे एक स्ट्रक्चर दाखवले जाणार आहे त्यातून तुम्हाला जे योग्य वाटत आहे ते तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर सर्व माहिती किंवा तुमचा सर्वे व्यवस्थित पाहून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा अर्ज फायनल सबमिट करू शकणार आहात.Gharkul Gramin Yojana 2025 Maharashtra
Gharkul Gramin Yojana 2025 Documents
Gharkul Gramin Yojana 2025 Maharashtra

घरकुल योजना 2025 साठी हि कागदपत्रे आहेत आवश्यक :

  • कुटुंबप्रमुख व कुटुंबातील इतर दुसऱ्या एका व्यक्तीचे अथवा सदस्याचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचे जॉब कार्ड
  • रेशनिंग कार्ड
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्याची प्रत
  • जुन्या घरात राहत असल्याचे गट नंबर किंवा मिळकत नंबर उतारा
  • कुटुंबप्रमुखाचे स्वयंघोषणापत्र
  • मोबाईल क्रमांक जो की बँक खाते आणि आधार कार्ड ची लिंक असलेला असावा

हे पण वाचा:
DMER Bharti 2025 वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | DMER Bharti 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !